Thursday, January 03, 2008

It was my first argument today!!!

This is a very important day of my life!!!
It was my first final argument today! For the people not from legal background, final argument is the final stage of any case. Based on the evidence produced during the proceedings of the case AND effective final argument case is decided by the judge. So it had to be good...

शिवाय हे आर्ग्युमेंट आधी बाबा करणार होते.

Those who know my father as a lawyer can imagine how difficult it was for me to meet the expectations...I didn't have the ambitious goal of doing as good as him..but a simple achievable goal of doing my best :)

काल तयारी करता करता मधेच हळूच विचार आला होता डोक्यात की बाबांना सांगावं "तुम्हीच करा उद्या आर्ग्युमेंट"... but then u don't get such an opportunity again & again..& I had to grab this opportunity..

सकाळी तयारी करताना जाणवत होतं..की कॉलेजमधे मूट कोर्टस ला आर्ग्युमेंट करणं किती सोपी गोष्ट होती. तेव्हा कुणाचंच भविष्य आपल्या हातात नसतं, कुणाच्या आयुष्यभराचे पैसे मिळवून द्यायची जबाबदारी नसते, आपल्या परफॉर्मन्स वर कुणाच्या आयुष्याचा निर्णय होणार नसतो...पण ही जबाबदारी डोक्यावर पडली की आपोआप चांगलंच करायची इच्छा होते.

तशी आधी छोटी छोटी आर्ग्युमेंट्स, केस मेन्शन करणं वगैरे प्रकार केले होते मी, पण आज तितकं सोपं काम नव्हतं..

तर आम्ही कोर्टरूम मधे पोचलो... साहेबांसमोर (जज) काहीच काम नव्हतं...ते जसं काही माझंच आर्ग्युमेंट ऐकायला मोकळे बसलेत असे बसले होते...शेवटी तो क्षण आला. सरांनी मेन्शन केलं साहेबांसमोर काम...आणि सांगितलं आणि माझे हात पाय गार पडले :) महाभारतातल्या अर्जुनासारखे ... पण तेवढ्यात जजनी विरुद्ध बाजूच्या वकिलांची वाट पाहू..आणि मग चालवू असं सांगितलं....माझा गेलेला धीर यायला सुरुवात झाली..कॉलेजमधल्या १०० प्रेझेंटेशन्स, मूटस आणि लेक्चर्स चा फायदा झाला..
अत्रे सर मला ओरडायचे ते आठवलं...की आर्ग्युमेंट्च्या सुरुवातीला नेहमी आवाज खूप खोल जातो तुझा..आणि सुरु झालं की थोड्या वेळात नीट खणखणीत बोलायला लागतेस... त्यामुळे पहिल्यापासून नीट बोलायचंय असं लक्षात ठेवलं होतं..

साहेबांनी शेवटी ते वकिल न येताच सुरु करायला सांगितलं...आणि आमची पॅसेंजर स्पीड्नी जाणं अपेक्षित असलेली गाडी एक्स्प्रेस झाली. १०- १५ मिनिटात माझं आर्ग्युमेन्ट संपलं....संपल्यावर साहेबांचा चेहरा तरी प्रसन्न होता. त्यांनी सरांना विचारलं 'काही सप्प्लिमेंटरी आर्ग्युमेंट आहे का तुमचं?' सरांनी नाही सांगितल्यावर थोडं थोडं डोक्यात शिरायला लागलं...की आपलं आर्ग्युमेंट झालं आहे, चांगलं झालं आहे, काहीही न गाळता झालंय, सगळे पॉइंट कव्हर केलेत, आणि बऱ्यापैकी परिणामकारक झालंय, आपल्याला मधे मधे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देता आलीयेत....

आणि मग मी नंतरचा सगळा दिवस फारच खुश आहे..
आणखी एक शिकले की ते काम तिथेच सोडून नंतर लगेच दुसऱ्या कामात लक्ष..दुसरं काम पुढे चालू...आणि पुढच्या परफॉर्मन्सची तयारी :)..

The show must go on & on & on :)

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!

7 Comments:

At 4:05 am, Blogger Sailee Raje said...

I am sure you made your dad proud! :)
and good luck for all your future arguments!

 
At 5:30 am, Blogger A woman from India said...

अभिनंदन. नुसत्या व्यावसाईक यशापयशाचा विचार नं करता हा कुणाच्या तरी आयुष्यातला महत्वाचा प्रश्नं आहे ही जाणीव कौतुकास्पद आहे. पाऊल ठेवण्यातल्या काळातली ही संवेदना शेवटपर्यंत अशीच टिकुन रहावी व तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळावे ही सदिच्छा.

 
At 4:01 pm, Blogger Unknown said...

मला एकदम माझे जुने दिवस आठचले. मला कधीच argument करण्याची हिम्मत झाली नाही. कदाचित तो आत्मविश्वास कधी आलाच नाही. त्यामुळे सरळ नोकरीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यात जरी खुश असले तरी साहेबापुढे उभे राहून बोलण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहीली.

 
At 11:29 pm, Blogger Unknown said...

Hey that's awesome....you gave your first argument speech!!(I hope that's the right term)
Congrats and all the best for many more to come :)

 
At 9:27 am, Blogger कोहम said...

masta vatala, vegalyach vyavasayatala anubhav vachun, ajun yeude....mala maza pahila presentation athavala....similar

 
At 11:16 pm, Blogger Shakti said...

Hi Sayali,

It's Great feeling to find your blog.. and that toois about your first final argument in court.. I think you did gr8 job.. and you were always sensitive and thoughtful at a same time .. hope you continue to grow..

 
At 12:51 am, Blogger Jaydeep H said...

hey very nicely written!
All the best for all the future arguments!!!

 

Post a Comment

<< Home