Thursday, March 09, 2006

सुख सुख म्हणतात ते हेच!

आज सकाळ्पासून हवा खूप सुंदर आहे. ढगाळ, पावसाळी वातावरण आहे. वारं पण आहे.....गाडीवरून भटकायला लई मज्जा आली..आणि पावसाच्या आवाजात खिडकीतून बाहेर पाहत लेक्चर करायला पण......

आत्ता बाहेर पाउस पडतोय!!!! आणि मी वाफाळत्या चहाचा कप घेऊन खिडकीत उभी आहे...

अशा छोट्या छोट्या क्षणांपेक्षा आणखी काय पाहिजे सुखी असायला ???

9 Comments:

At 4:25 pm, Blogger शंतनू said...

चहाने भरलेला चहाचा कप, इंधन असलेली गाडी, चांगली तब्येत, .... ;)

 
At 4:25 pm, Blogger शंतनू said...

आणि दृष्टीकोन

 
At 5:39 pm, Blogger abhijit said...

आणि सांगू......



गरमागरम भजी

 
At 5:42 pm, Blogger abhijit said...

well said actully.

Live every moment of life at its best. extract joy from small things. You won't really have to climb evrest every time. :-P

 
At 9:25 am, Blogger Apoorv said...

आणि बरोबर कोणीतरी...

 
At 11:48 am, Blogger धनंजय देव said...

तुझे लिखाण आणि अपूर्वची प्रतिक्रीया वाचुन मला दीड वर्षापूर्वीची आठवण झाली. पुण्याहून बंगलोरला निघालो होतो रेल्वेनी. मे महिन्याचा कडक उन्हाळा होता, साडेतीन चारची वेळ असावी. गाडी आणि आंध्रप्रदेशचा उजाड माळरान दोन्ही तापून चांगल्याच झळा जाणवत होत्या. पण तश्यात अचानक हळुहळु आभाळ भरून येतंयसं वाटायला लागलं, खिडकीतून बघितल्यावर ट्रेन ऊन सोडुन गडद काळ्या ढगांच्या सावलीत जाताना दिसली. काही मिनीयातंच उन्हाचा देखावा बदलुन अंधारन आलं, ढग गडगडायला लागले, वीजा चमकायला लागल्या आणि बघता बघता पाऊस आता कोसळायला सुरुवात करतो का नंतर अशी परिस्थिती आली. आता सिटवर बसणं शक्यच नव्हतं, तापलेल्या जमिनीवर पडणारा एखाद्दुसरा पाण्याचा थेंब सोसाट्याचा वारा मृद्गंधानी भरुन टाकत होता, त्याचा आनंद दारातंच जाउन घ्यायला हवा होता.


दारात एका बाजुला दोघेजंण याच पावसाचा आनंद एकमेकाच्या साथीनी, एकमेकांच्या हातात हात देउन घेत होते, आणि दुसर्या बाजुला मी एकटाच ... खरंच कोणितरी बरोबर पाहिजे याची प्रकर्षानी जाणीव करुन घेत पावसाचे ते अनमोल दृष्य बघत होतो.

 
At 11:59 am, Blogger Sayali Ganu Dabake said...

अपूर्व आणि धनंजय : बरोबर असणं आणि सोबत असणं यात फरक आहे....पण खरंय... कुणीतरी बरोबर असलं तर ......

 
At 12:15 pm, Blogger शंतनू said...

कुणीतरी बरोबर असलं तर ......
तर पुढे काय? ;)

 
At 6:26 am, Blogger Fleiger said...

एक कप कॉफ़ी आणि एक सुंदरसे पुस्तक...

 

Post a Comment

<< Home