Friday, September 11, 2009

सुविचार २

केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हावे!

Thursday, December 04, 2008

Calvin says it so well !!


Often it takes some calamity to make us live in the present. Then suddenly we wake up and see all the mistakes we have made. But it is too late to change anything.

- Calvin

Thursday, January 03, 2008

It was my first argument today!!!

This is a very important day of my life!!!
It was my first final argument today! For the people not from legal background, final argument is the final stage of any case. Based on the evidence produced during the proceedings of the case AND effective final argument case is decided by the judge. So it had to be good...

शिवाय हे आर्ग्युमेंट आधी बाबा करणार होते.

Those who know my father as a lawyer can imagine how difficult it was for me to meet the expectations...I didn't have the ambitious goal of doing as good as him..but a simple achievable goal of doing my best :)

काल तयारी करता करता मधेच हळूच विचार आला होता डोक्यात की बाबांना सांगावं "तुम्हीच करा उद्या आर्ग्युमेंट"... but then u don't get such an opportunity again & again..& I had to grab this opportunity..

सकाळी तयारी करताना जाणवत होतं..की कॉलेजमधे मूट कोर्टस ला आर्ग्युमेंट करणं किती सोपी गोष्ट होती. तेव्हा कुणाचंच भविष्य आपल्या हातात नसतं, कुणाच्या आयुष्यभराचे पैसे मिळवून द्यायची जबाबदारी नसते, आपल्या परफॉर्मन्स वर कुणाच्या आयुष्याचा निर्णय होणार नसतो...पण ही जबाबदारी डोक्यावर पडली की आपोआप चांगलंच करायची इच्छा होते.

तशी आधी छोटी छोटी आर्ग्युमेंट्स, केस मेन्शन करणं वगैरे प्रकार केले होते मी, पण आज तितकं सोपं काम नव्हतं..

तर आम्ही कोर्टरूम मधे पोचलो... साहेबांसमोर (जज) काहीच काम नव्हतं...ते जसं काही माझंच आर्ग्युमेंट ऐकायला मोकळे बसलेत असे बसले होते...शेवटी तो क्षण आला. सरांनी मेन्शन केलं साहेबांसमोर काम...आणि सांगितलं आणि माझे हात पाय गार पडले :) महाभारतातल्या अर्जुनासारखे ... पण तेवढ्यात जजनी विरुद्ध बाजूच्या वकिलांची वाट पाहू..आणि मग चालवू असं सांगितलं....माझा गेलेला धीर यायला सुरुवात झाली..कॉलेजमधल्या १०० प्रेझेंटेशन्स, मूटस आणि लेक्चर्स चा फायदा झाला..
अत्रे सर मला ओरडायचे ते आठवलं...की आर्ग्युमेंट्च्या सुरुवातीला नेहमी आवाज खूप खोल जातो तुझा..आणि सुरु झालं की थोड्या वेळात नीट खणखणीत बोलायला लागतेस... त्यामुळे पहिल्यापासून नीट बोलायचंय असं लक्षात ठेवलं होतं..

साहेबांनी शेवटी ते वकिल न येताच सुरु करायला सांगितलं...आणि आमची पॅसेंजर स्पीड्नी जाणं अपेक्षित असलेली गाडी एक्स्प्रेस झाली. १०- १५ मिनिटात माझं आर्ग्युमेन्ट संपलं....संपल्यावर साहेबांचा चेहरा तरी प्रसन्न होता. त्यांनी सरांना विचारलं 'काही सप्प्लिमेंटरी आर्ग्युमेंट आहे का तुमचं?' सरांनी नाही सांगितल्यावर थोडं थोडं डोक्यात शिरायला लागलं...की आपलं आर्ग्युमेंट झालं आहे, चांगलं झालं आहे, काहीही न गाळता झालंय, सगळे पॉइंट कव्हर केलेत, आणि बऱ्यापैकी परिणामकारक झालंय, आपल्याला मधे मधे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देता आलीयेत....

आणि मग मी नंतरचा सगळा दिवस फारच खुश आहे..
आणखी एक शिकले की ते काम तिथेच सोडून नंतर लगेच दुसऱ्या कामात लक्ष..दुसरं काम पुढे चालू...आणि पुढच्या परफॉर्मन्सची तयारी :)..

The show must go on & on & on :)

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!

Monday, May 28, 2007

सुविचार...

सुविचार...
मुंगी तुमच्यापेक्षा आकाराने लहान असते, पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते.
तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना?

म्हणूनच कुणालाही कमी लेखू नये!


:D :D :D

Thursday, March 01, 2007

माझं आभाळ!

कधी कधी कुठेतरी अवचितपणे एक आभाळाचा तुकडा सापडतो, जो फक्त आपला असतो. त्यातला सूर्य, त्यातले ढग, पक्षी सगळं सगळं आपलं असतं.
मग त्या सूर्याबरोबर आपण पण प्रकाशात नहातो! त्या पक्षाबरोबर आपण पण भरारी मारतो!

अचानक पणे क्षितिज विस्तारतं! वेगळ्या वाटा खुणावायला लागतात!

पण हे असं अचानकपणे विस्तारलेलं क्षितिज समाधान देऊन जातं! बराच काळ पुरणारं समाधान, जे आयुष्याच्या पुढच्या प्रवासाची शिदोरी बनतं...पुढं पुढं जायचं बळ देतं!

का नवीन क्षितिज शोधायची वेळ आली की आभाळ असं अचानकपणेच भेटतं?

Monday, August 14, 2006

ये रे ये रे पावसा...

लहानपणी मी एक बडबडगीत म्हणायचे पावसाला बोलावण्यासाठी..

ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाउस आला मोठा!

परवा माझ्या लहान भावाला हे गाणं शिकवताना सहज डोक्यात विचार आला..
गेली दोन वर्षं महाराष्ट्रात अतिवॄष्टी होत आहे..ती नक्की पैसा खोटा झाल्यानी? का खोट्याचा पैसा जास्ती झाल्यानी?

Saturday, July 01, 2006

किल्ले तोरणगड

गेले दोन - अडीच महीने सलग काम केल्यावर आत्ता कुठे सुट्टी (म्हणजे कमी काम) चालू झाली आहे.... आणि सुट्टीची सुरुवात परत एकदा एका झकास ट्रेकनी केली आहे.
आत्ताच मी तोरण्यावर चढाई करून परत येत आहे!! दिवसभर पावसात अगदी नखशिखांत चिंब भिजल्यावर आत्ता कुठे कोरड्या कपड्यांची आणि गरम गरम खाऊ आणि कॉफीची ऊब जराशी अंगात मुरायला लागली आहे. आणि मी ट्रेक परत एकदा अनुभवायला लागलिये...

कालपर्यंत आज ट्रेकला जायचं क नाही हे नक्की नव्हतं (नेहमीप्रमाणेच)... पण शेवटी एकदा आज बाहेर पडायचं हे नक्की झालं. आज सकाळी घड्याळानी पण दगा दिला आणि गजर वाजलाच नाही...पण जाणं जमायचंच होतं बहुतेक, त्यामुळे निघायचं ठरलेल्या वेळेच्या आधी ५ मिनिटं जाग आली...मग सुपरफास्ट वेगानी आवरलं आणि आमची स्वारी बाहेर पडली.
दिवसभरात काय करणार आहोत याची झलक पुण्यातंच स्वारगेटला जाईपर्यंत भिजून मिळाली. ५ डोक्यांपैकी फक्त ३ डोकी उगवली होती. मग बस लागल्यावर त्या दोघांसाठी न थांबता आम्ही पुढे निघालो. पुढच्या बसनी बाकी लोक पण(म्हणजे २ जण) १० ला वेल्ह्याला आले. नाश्ता करून आम्ही गड चढायला लागलो.
ट्रेक आहे आणि रस्ता चुकला नाही असं कधी होणं शक्य आहे का? आणि रस्ता न चुकता झाला तर तो ट्रेक कसला?
तर रस्ता चुकण्याचा नियम पुरा करत आम्ही भलतीकडेच गेलो....आणि मग भलत्याच वाटेनी भर पावसात दिव्य करत अचानकपणे मुख्य वाटेला लागलो. मग मात्र रस्ता चुकायला फारसा वाव नसल्यानी आम्ही सरळ सरळ चालत मोठ्या चढणी पार केल्या.

आणि अचानकपणे समोर एक भव्य असा धबधबा आला.... एकदम उंच आणि गार असा धबधबा होता तो! पाण्याला वेग तर भयंकरच होता. थोडा वेळ या धबधब्यात डुंबुन झाल्यावर आम्ही परत पुढे चालायला लागलो. आता सगळा दगडी टप्पा होता. चढताना फार त्रास नाही झाला पण या वाटेवरून नंतर परत उतरायचं आहे हे मात्र राहुन राहुन डोक्यात येत होतं.
शेवटी एकदाचे वर गडावर पोचलो. वरचं तोरणाईचं मंदिर नुकतंच बांधून काढलं आहे. त्यामुळे जेवेपर्यंत घोंघवणारा वारा आणि धो धो पडणारा पाऊस यांना अडवणारा एक उत्तम आडोसा मिळाला.
एव्हाना भिजल्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. पण पोटात अन्न गेल्यावर मात्र थंडी वाजायला लागली. आणि काढून ठेवलेले ओले बूट-मोजे आणि जर्किन्स घालायचं जिवावर यायला लागलं. शेवटी एकदाचा सगळा जामानिमा परत चढवून उतरायला सुरुवात केली.
चढताना वाटलं होतं तेवढं उतरणं अवघड नाही गेलं. मात्र दगडी टप्पा ओलांडून खाली पोचल्यावर मात्र सोसाट्याचा वारा म्हणजे काय त्याचं चांगलंच प्रात्यक्षिक पहायला मिळालं. मी तर उडून जाता जाता राहिले!!!
हे सगळे टप्पे इमानेइतबारे पार पाडल्यावर शेवटचा टप्पा होता ते म्हणजे एक ओढा पार करायचा... भरपूर पाणी आणि थोडीशी ओढ असलेला हा ओढा पण पार केला आणि दिवसाभराचं काम संपलं!!
मग बसची वाट न बघता जीपनी हायवे पर्यंत आलो. तिथे पण आमच्यासाठीच आल्यासारखी एस.टी. येउन थांबली आणि आमच्या स्वाऱ्या तोरण्यावरची चढाई यशस्वी करून पुण्याला परतल्या.