Thursday, March 01, 2007

माझं आभाळ!

कधी कधी कुठेतरी अवचितपणे एक आभाळाचा तुकडा सापडतो, जो फक्त आपला असतो. त्यातला सूर्य, त्यातले ढग, पक्षी सगळं सगळं आपलं असतं.
मग त्या सूर्याबरोबर आपण पण प्रकाशात नहातो! त्या पक्षाबरोबर आपण पण भरारी मारतो!

अचानक पणे क्षितिज विस्तारतं! वेगळ्या वाटा खुणावायला लागतात!

पण हे असं अचानकपणे विस्तारलेलं क्षितिज समाधान देऊन जातं! बराच काळ पुरणारं समाधान, जे आयुष्याच्या पुढच्या प्रवासाची शिदोरी बनतं...पुढं पुढं जायचं बळ देतं!

का नवीन क्षितिज शोधायची वेळ आली की आभाळ असं अचानकपणेच भेटतं?

0 Comments:

Post a Comment

<< Home