Monday, August 14, 2006

ये रे ये रे पावसा...

लहानपणी मी एक बडबडगीत म्हणायचे पावसाला बोलावण्यासाठी..

ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाउस आला मोठा!

परवा माझ्या लहान भावाला हे गाणं शिकवताना सहज डोक्यात विचार आला..
गेली दोन वर्षं महाराष्ट्रात अतिवॄष्टी होत आहे..ती नक्की पैसा खोटा झाल्यानी? का खोट्याचा पैसा जास्ती झाल्यानी?

3 Comments:

At 6:10 pm, Blogger Asawari said...

hey this song also reminds me of other songs from my childhood like - "sang sang bholanath", "konas thauk kasa pan shalet gela sasa", "shepti valya pranyanchi ekda bharli sabha", etc..........total nostalgia :)

 
At 6:24 am, Blogger Fleiger said...

पण ह्या धावून आलेल्या सरीमुळे ज्यांची मडकी वाहून जातात, त्यांनी पावसाला खोटा पैसा दिलेला नसतो ना...

 
At 12:03 am, Blogger शिरीष गानू said...

लहानपणी ऐकलेल्या अनेक निरर्थक बडबड-गीतांपैकी हे एक.. पण तुझे अवलोकन फारच चपखल आहे. दोन क्षण खरच त्या शेवटच्या वाक्यावर घुटमळलो..माझ्यामते पैशाचा आणि पावसाचा तसा कहीच संबंध नसावा. माझ्या मते तरी समाजात पूर्वी देखील तेवढीच लबाडी होती जेवढी आता आहे. केवळ दळणवळणाच्या साधनांमुळे अ एकंदर लोकसंख्याच वाढल्यामुळे असे वाटायला लागले असेल की आता जरा जास्तच "खोटा" पैसा आहे.

 

Post a Comment

<< Home